Home वेब स्टोरीजविरारमध्ये पत्नीच्या हत्येचा थरार: १२ तासांत आरोपी पतीला पनवेलमधून बेड्या

विरारमध्ये पत्नीच्या हत्येचा थरार: १२ तासांत आरोपी पतीला पनवेलमधून बेड्या

by Real Khabren
0 comments
विरारमध्ये पत्नीच्या हत्येचा थरार: १२ तासांत

विरारमधील ग्लोबल सिटी परिसरात एका महिलेची तिच्याच पतीने दुसऱ्या पत्नीच्या मदतीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी बोळींज पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास करत अवघ्या १२ तासांच्या आत मुख्य आरोपी पती आणि त्याच्या दुसऱ्या पत्नीला पनवेलमधून अटक करण्यात आले.

आरती (३०) असे मृत महिलेचे नाव आहे. आरतीची हत्या तिचा पती मुन्ना याने त्याची दुसरी पत्नी मीरा हिच्या मदतीने केली होती. याप्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. हत्येनंतर दोन्ही आरोपी फरार झाले होते, ज्यामुळे पोलिसांसमोर त्यांना शोधण्याचे मोठे आव्हान होते.

तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान आरोपींचे मोबाईल लोकेशन पनवेलमधील बेलवली परिसरात असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पथके तयार करून ठाणे, पनवेल आणि विरार परिसरातील शेकडो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले.
सीसीटीव्हीमध्ये आरोपी मुन्ना, त्याची दुसरी पत्नी आणि दोन मुलांसह पनवेल येथील एका रिक्षा स्टँडवर उतरताना दिसला. पोलिसांनी त्याचा फोटो मिळवून स्थानिक परिसरात चौकशी केली असता, तो पनवेलमधील ‘वाधवा वाईज सिटी’ या बांधकाम प्रकल्पावर मजुरीचे काम करत असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी सापळा रचून मुन्ना आणि मीरा या दोघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आरोपी मुन्ना याने आपला गुन्हा कबूल केला आहे. मृत आरती हिचे अन्य व्यक्तीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून आपण तिची हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.

You may also like

Leave a Comment